Dept. of Geography

भूगोल विभागाची सुरवात सन १९९८-९९ पासून पदवी स्तरावर श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात झाली. एकविसावे शतक संपुष्टात येण्याच्या आधीच माणसाला पुढच्या शतकाची चाहूल लागली.कारण येणारा शतक हे मानवी अस्तित्वाचीच शंका घेऊन उगवणारा शतक होता. खालावणारा व्यक्तिगत जीवन, भागणारी कुटुंब ढासळणारी समाजरचना आणि खंगारणारा पर्यावरण या दिशेने चालणारा माणसाचा प्रवास.

आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चार भिंतीच्या आड शिक्षण देणे असा भूगोलाचा उद्देश नाही तर वेगवेगळ्या स्थळांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांच्या मनात भूगोलाविषयी आवड, रुची निर्माण करून त्यांना MPSC, UPSC , GIS, सर्वेक्षण ऑफिसर, बँकिंग क्षेत्र आणि विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचे काम भूगोल विभाग करीत आहे.

भूगोल विषयाच्या अभ्यासाचा आढावा घेण्याकरिता घटक चाचणी, आकस्मिक चाचणी, असायमेंट, सेमिनार, ग्रुप डिस्कशन आणि विद्यापीठाच्या परीक्षेच्या दृष्टीकोनातून मागील पाच वर्षाच्या पेपरची उजळणी व प्रश्नसंचिकाद्वारे प्रश्न सोडवून घेणे, अशा पद्धतीने विविध कार्य भूगोल विभागाद्वारे केले जाते.

भूगोल विभागामध्ये वरिष्ठ विभागाकरिता प्रा. डॉ. प्रमोद एम. वसाके तर कनिष्ठ विभागाला प्रा. राजेश मून हे कार्यरत आहेत.